Tuesday, June 26, 2007

काय म्हणता? (मराठी कविता)

काय म्हणता, काळ बदळला?
पुर्वीच काळ सुखाचा
आता नाही कोण कुणाचा
तोच प्रवास, तोच रस्ता
वीट आलाय या जीवनाचा.
 
मान्य आहे, इंधन महागलंय, प्रदूषण वाढलंय
पण कधी पहाटे लवकर उठून
घन:श्याम सुंदरा ऐकलंय?
ते राहू द्या, सुर्योदयाचं मनोहर रुप
शेवटचं केव्हा पाह्यलंय?
 
मान्य आहे, तुम्ही खूप धावपळ करता,
एकाच वेळी अनेक ठिकाणी असता
पण पाहिलाय कधी पौर्णिमेचा चंद्र
कोजागिरी वगळता?
तृण मखमालीवर आकाश पांघरुन
मोज्ल्यात कधी चांदण्य़ा रात्र सरता?
 
मान्य आहे पाउलवाटांचे हमरस्ते झालेत
अन मनाचे कप्पे अरुंद झालेत.
जरी करीत असाल तुम्ही इंटर्नेटवर हजारो मित्र
पाठवितही असाल ढिगांनी ई-मेल अन चित्र
पण कुणाला पाठवलंय कधी एखादं
पान्नास पैशाचं अंतरदेशीय पत्र?
अन लुटलाय का कधी पोस्टमेन कडून
शुभेच्छा तार स्विकारल्याचा स्वानंद?
 
मान्य आहे, जीवनमान बदललंय,
पालटलाय साराच नूर
आम्हालाही पडते आजकाल
डिजे पार्ट्यांची भूल
पण ऐकलाय का हो कधी
रेडियोवर अकराचा बेला के फ़ूल?
 
मला नाही कळत असं काय झालंय
की ज्यानं आपलं अवघं विश्वच बदललयं
 
सुर्य नाही बदलला, चंद्रही नाही बदलला
काळ आहे तिथेच आहे तो नाही बदलाअ
तुमचा आमचा पहाण्याचा नजरीया बदलला.
 
--------------------------------------------------
एक फ़ार्वर्डेड तस्वीर से यूनिकरण

3 comments:

Anonymous said...

I REALLY LIKE YOUR POEM. APPRECIATED. BUT TELL ME 1 THINK THAT HAVE YOU COPYIED THIS ???????

DO NOT COPY FROM ANYWHERE. MAKE YOUR OWN THOUGHTS CREATE YOUR OWN WORDS.

i never wish to heart but it is my opinion.
reshma (reshma11187@yahoo.co.in)

teena said...

its a very nice and cool poem
thanks

labadboka said...

नमस्कार विजय वडनेरे ! मी लबाड बोका. तुमची ही कविता मला खूप खूप आवडली. मी सुद्धा काही ब-यावाईट कविता केल्या आहेत. माझ्या कविता तुम्हाला www.manbimb.blogspot.com आणि www.myavmyav.blogspot.com या ब्गॉगवर वाचायला मिळतील.